Mohanlal Receives 2023 Dadasaheb Phalke Award, Ashwini Vaishnav Announces (2025)

एक्स्प्लोर

लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू

यूजफुल

होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर

मुख्यपृष्ठकरमणूकMohanlal : अभिनेते-निर्माते मोहनलाल यांना 2023 चा दादासाहेब फाळके पुरस्कार, अश्विनी वैष्णव यांच्याकडून घोषणा

Mohanlal : अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते मोहनलाल यांना 2023 चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. 23 सप्टेंबरला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

By : जगदीश ढोले|Updated at : 20 Sep 2025 11:52 PM (IST)

Mohanlal Receives 2023 Dadasaheb Phalke Award, Ashwini Vaishnav Announces (1)

मोहनलाल

Source : एबीपी माझा ग्राफिक्स टीम

नवी दिल्ली : भारत सरकारच्यावतीनं दिला जाणारा 2023 साठीचा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार घोषित मल्याळम सिनेसृष्टीतील अभिनेते , निर्माते, दिग्दर्शक मोहनलाल यांना जाहीर झाला आहे. मिथुन चक्रवर्ती,शंकर महादेवन, आशुतोष गोवारीकर या तिघांच्या दादासाहेब फाळके पुरस्कार निवड समितीनं मोहनलाल यांच्या नावाची शिफारस केली. त्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला.

भारत सरकारने आज दिग्गज अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता मोहनलाल यांना 2023 या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर केला आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. 23 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या 71 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

मोहनलाल यांच्या भारतीय चित्रपट सृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार घोषित करताना आनंद वाटत असल्याचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण, रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं. मोहनलाल यांचा चित्रपट सृष्टीतील उल्लेखनीय प्रवास येणाऱ्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांची अतुलनीय प्रतिभा, अष्टपैलुत्व आणि अथक परिश्रम यांनी भारतीय चित्रपट इतिहासात एक सुवर्ण मापदंड प्रस्थापित केला आहे, असं अश्विनी वैष्णव म्हणाले.

मोहनलाल यांची कारकीर्द (Mohanlal Career)

मोहनलाल विश्वनाथन नायर ख्यातनाम अभिनेते, निर्माते आणि पार्श्वगायक आहेत. ते मल्याळम चित्रपटसृष्टीतील त्यांच्या कामासाठी प्रसिद्ध आहेत. "परिपूर्ण अभिनेते " म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोहनलाल यांनी पाच दशकांच्या कारकिर्दीत 360 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. किरीदम, भरतम, वानप्रस्थम, दृश्यम आणि इतर चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या आहेत.

मोहनलाल यांनी पाच राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि अनेक केरळ राज्य चित्रपट पुरस्कारांसह भारत आणि परदेशात अनेक सन्मान मिळवले आहेत. 1999 साली प्रदर्शित झालेला त्यांचा 'वानप्रस्थम' हा चित्रपट कान चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला, ज्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली.

मोहनलाल यांना 2009 साली भारतीय टेरिटोरियल आर्मीमध्ये मानद लेफ्टनंट कर्नल म्हणून नियुक्त करण्यात आले. भारत सरकारने त्यांना 2001 साली पद्मश्री आणि 2019 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित केले आहे.

दादासाहेब फाळके पुरस्कार (Dadasaheb Falke Award)

दादासाहेब फाळके यांनी 1913 साली ‘राजा हरिश्चंद्र’ या भारतातील पहिल्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. भारतीय चित्रपटसृष्टीसाठी त्यांनी दिलेल्या योगदानाच्या स्मरणार्थ भारत सरकारने दादासाहेब फाळके पुरस्कार सुरू केला. 1969 मध्ये देविका राणी यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार असलेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारानं सन्मानित होणारे हे चित्रकर्मी, भारतीय सिनेमाची निर्मिती आणि विकासात त्यांनी दिलेल्या असामान्य योगदानासाठी ओळखले जातात. सुवर्णकमळ पदक, शाल आणि 10 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

Truly humbled to receive the Dadasaheb Phalke Award. This honour is not mine alone, it belongs to every person who has walked alongside me on this journey. To my family, audience, colleagues, friends, and well wishers, your love, faith, and encouragement have been my greatest…

— Mohanlal (@Mohanlal) September 20, 2025

हेदेखील वाचा

'पुढचे शो हाऊसफुल्ल व्हावेत, हीच शुभेच्छा', विक्की कौशलकडून 'या' मराठी नाटकाचं तोंड भरुन कौतुक

Published at : 20 Sep 2025 11:52 PM (IST)

Tags :

Mohanlal Ashwini Vaishnaw Indian Cinema

आणखी वाचा

Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

महाराष्ट्र धाराशिवमध्ये छमछम बंद होणार? पाच कलाकेंद्र चालकाविरोधात गुन्हे दाखल, पोलिसांची धडक कारवाई व्यापार-उद्योग H-1B Visa च्या फी वाढीचा पहिला फटका, इन्फोसिस, विप्रोच्या ADR मध्ये घसरण, सोमवारी आयटी स्टॉक्स कोसळणार? क्रिकेट Ind vs Pak: आम्ही सदैव राष्ट्रासोबत, सोनी टीव्हीचं शिवसेनेला पत्र; भारत-पाक सामन्यासंदर्भात मागितली माफी ठाणे नवरात्री काळात ठाणे मार्गांवर जड वाहनांना बंदी; पोलिसांकडून आदेश जारी, दसऱ्यापर्यंत अशी असेल वाहतूक

Advertisement

Advertisement

Advertisement

व्हिडीओ

फोटो गॅलरी

करमणूक 7 Photos शिल्पा शिरोडकर सचिन तेंडुलकरच्या प्रेमात होती - नाते तुटले? वर्षानुवर्षांचं आपले मौन सोडत म्हणाली, "अ‍ॅफेअर..."
करमणूक 7 Photos रामलीलामध्ये पूनम पांडेच्या एन्ट्रीवरून 'महाभारत', रावणाची बायको मंदोदरीची साकारणार भूमिका
करमणूक 7 Photos हॉरर, कॉमेडीचा मसाला, ट्वीस्ट अँड टर्न्स अन् एक भयानक आत्मा; शेवटपर्यंत खिळवून ठेवते 'ही' साऊथची फिल्म

ट्रेडिंग पर्याय

Mohanlal Receives 2023 Dadasaheb Phalke Award, Ashwini Vaishnav Announces (22)

एबीपी माझा वेब टीम

Marathwada Liberation Day: मराठवाडा मुक्ती संग्रामदिन: स्थलांतरित मराठवाडा – चिंता व चिंतन

Opinion

Mohanlal Receives 2023 Dadasaheb Phalke Award, Ashwini Vaishnav Announces (2025)
Top Articles
Latest Posts
Recommended Articles
Article information

Author: Cheryll Lueilwitz

Last Updated:

Views: 6679

Rating: 4.3 / 5 (74 voted)

Reviews: 81% of readers found this page helpful

Author information

Name: Cheryll Lueilwitz

Birthday: 1997-12-23

Address: 4653 O'Kon Hill, Lake Juanstad, AR 65469

Phone: +494124489301

Job: Marketing Representative

Hobby: Reading, Ice skating, Foraging, BASE jumping, Hiking, Skateboarding, Kayaking

Introduction: My name is Cheryll Lueilwitz, I am a sparkling, clean, super, lucky, joyous, outstanding, lucky person who loves writing and wants to share my knowledge and understanding with you.